बंद

    25.07.2020: राज्यपालांची नागपुर येथील वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट

    प्रकाशित तारीख: July 25, 2020

    राज्यपालांची नागपुर येथील वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (दि. 24) गोरेवाडा, नागपुर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच वन विभागाद्वारे संचालित वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.