बंद

    25.05.2022: राज्यपालांच्या हस्ते प्रजा डायरी मासिकाचा मातृदिन विशेषांक प्रकाशित

    प्रकाशित तारीख: May 25, 2022

    राज्यपालांच्या हस्ते प्रजा डायरी मासिकाचा मातृदिन विशेषांक प्रकाशित

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे तेलुगू मासिक प्रजाडायरीच्या मातृदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्री हिराबेन यांना हा अंक समर्पित करण्यात आला आहे.

    यावेळी ‘प्रजाडायरी’ मासिकाचे संपादक प्रजाडायरी सुरेश, तिरुमला बँकेचे संचालक एन. चंद्रशेखर, व्हीजीआर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ वेणुगोपाल रेड्डी, मानम फाउंडेशनचे संस्थापक आर एस कुमार, उद्योजक आनंद चोरडिया, कलाकार महेश तुपाकूला, एस महेंद्र बाबू गौड, पोथू राजाराम, लता श्रीनिवास पारपेल्ली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.