बंद

    25.05.2021 : तौते चक्रीवादळामध्ये चार जणांचेप्राण वाचवणाऱ्या तरुणांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

    प्रकाशित तारीख: May 25, 2021

    तौते चक्रीवादळामध्ये चार जणांचेप्राण वाचवणाऱ्या तरुणांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

    तौते चक्रीवादळामध्ये आपला जीव धोक्यात घालून चार जणांचे प्राण वाचवणाऱ्या माहिमच्या अनिकेत तरे, निखिल तरे, मनिष तरे, सचिन मोरे, अविनाश राठोड या तरुणांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आशिष शेलार व आमदार रमेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.