बंद

  25.01.2022 :महिलांचे दंतआरोग्य विषयावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

  प्रकाशित तारीख: January 25, 2022

  महिलांचे दंतआरोग्य विषयावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महिलांचे दंत आरोग्य या विषयावरील ‘गाईड टू ओरल केअर फॉर विमेन’ या पुस्तकाचे मंगळवारी राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

  कार्यक्रमाला पुस्तकाच्या लेखिका व हिंदुजा खार हॉस्पिटल येथील दंत शल्यचिकित्सक डॉ करिष्मा विजन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ किरण कोएल्हो व मानसोपचार तज्ज्ञ डॉ अंजली छाब्रिया उपस्थित होते.

  महिलांच्या जीवनातील विविध टप्प्यांवरील दंत आरोग्याच्या समस्या व उपाय या विषयावर पुस्तकामध्ये उपयुक्त माहिती देण्यात आली असून पुस्तकाचा अनुवाद मराठी, हिंदी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये केल्यास अनेक महिला लाभान्वित होतील, असे राज्यपालांनी सांगितले. पुरुषांच्या दंत आरोग्याच्या देखील अनेक समस्या असून त्या विषयावर देखील पुस्तक लिहून जनसामान्यांचे प्रबोधन करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.