बंद

    24.12.2021: नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: December 24, 2021

    नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या परोपकार, प्रेम, दया व करुणेच्या शिकवणीचे स्मरण देतो. नाताळचा पवित्र सण जीवनातील अंध:कार, निराशा व दु:ख दूर सारो व सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो. नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२२ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.