बंद

    24.06.2026 : संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट; कला इतिहास दस्तावेजीकरणावर चर्चा

    प्रकाशित तारीख : June 24, 2026
    संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट; कला इतिहास दस्तावेजीकरणावर चर्चा

    संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट; कला इतिहास दस्तावेजीकरणावर चर्चा

    कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर यांनी बुधवारी (दि. २४) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोक भवन येथे भेट घेऊन त्यांना आपल्या दोन नव्या पुस्तकांच्या प्रती भेट दिल्या.
    यावेळी दहिसरकर यांनी आपल्या ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तसेच ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कुल ऑफ आर्ट’ या दोन पुस्तकांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पाठारे दाम्पत्याच्या कार्याची तसेच धुरंधर यांच्या कला योगदानाची माहिती देताना कलेच्या दस्तावेजीकरणाचे महत्व अधोरेखित केले.

    व्ही.बी. पाठारे व प्रेमा पाठारे हे राज्यातील महाराष्ट्रातील समर्पित पहिले कलाकार दाम्पत्य होते. त्यांनी काढलेले महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांची तैलचित्रे विधानभवनात लावली असल्याचे त्यांनी सांगितले. पाठारे यांनी मुंबई ते पेशावर सायकलने परिक्रमा केली होती. देशभरातील नऊ कलारत्नांमध्ये एकट्या बंगालमधील सहा कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, जामिनी रॉय यांचा समावेश आहे तसेच अमृता शेरगील व रवी वर्मा यांचा समावेश आहे. परंतु पाठारे, धुरंधर यांच्या कार्याचे दस्तावेजीकरण झाले नसल्याने बॉम्बे स्कुल च्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

    दहिसरकर यांच्या कार्याचे कौतुक करताना आपण महाराष्ट्रातील लुप्त होत असलेल्या कला व लोककलांच्या जतनाचे कार्य हाती घेतले असल्याचे राज्यपालांनी सांगितले व या कार्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बंगालच्या कलाकारांना त्रिपुराच्या राजघराण्याने राजाश्रय दिला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी ज्येष्ठ चित्रकार व्ही. बी. पाठारे आणि प्रेमा पाठारे यांचे सुपुत्र वास्तुविशारद शिरीष पाठारे तसेच पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते उपस्थित होत्या.
    *****

    संदीप दहिसरकर ने की राज्यपाल से भेंट; कला इतिहास के दस्तावेजीकरण पर हुई चर्चा

    कला इतिहासकार एवं लेखक संदीप दहिसरकर ने बुधवार (24 जून) को महाराष्ट्र लोकभवन में महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा से शिष्टाचार भेंट की तथा अपनी दो नई पुस्तकों की प्रतियां उन्हें भेंट कीं।

    इस अवसर पर दहिसरकर ने अपनी पुस्तकों ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तथा ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कुल ऑफ आर्ट’ के विषय में जानकारी दी।

    उन्होंने पाठारे दंपति के योगदान तथा एम. वी. धुरंधर की कलात्मक उपलब्धियों का उल्लेख करते हुए भारतीय कला इतिहास के व्यवस्थित दस्तावेजीकरण के महत्व पर प्रकाश डाला।

    दहिसरकर ने बताया कि वी. बी. पाठारे और प्रेमा पाठारे महाराष्ट्र के पहले समर्पित कलाकार दंपति थे। उनके द्वारा निर्मित महात्मा ज्योतिराव फुले तथा डॉ. भीमराव आंबेडकर के तैलचित्र आज भी विधान भवन में प्रदर्शित हैं। उन्होंने यह भी बताया कि वी. बी. पाठारे ने मुंबई से पेशावर तक साइकिल यात्रा कर एक उल्लेखनीय अभियान पूरा किया था।

    कला इतिहास के संदर्भ में दहिसरकर ने कहा कि देश के नौ प्रमुख ‘कलारत्नों’ में से छह कलाकार बंगाल से रहे हैं, जिनमें रवीन्द्रनाथ टैगोर, अवनीन्द्रनाथ टैगोर, नंदलाल बोस और जामिनी रॉय प्रमुख हैं। इनके अतिरिक्त अमृता शेरगिल तथा राजा रवि वर्मा का भी महत्वपूर्ण स्थान है। उन्होंने खेद व्यक्त किया कि वी. बी. पाठारे तथा एम. वी. धुरंधर जैसे कलाकारों के कार्यों का पर्याप्त दस्तावेजीकरण न होने के कारण बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट की समृद्ध परंपरा को वह मान्यता नहीं मिल सकी जिसकी वह अधिकारी है।

    राज्यपाल ने दहिसरकर के प्रयासों की सराहना करते हुए कहा कि महाराष्ट्र की विलुप्तप्राय कला एवं लोककलाओं के संरक्षण और संवर्धन के लिए विशेष प्रयास किए जा रहे हैं। उन्होंने इस दिशा में दहिसरकर जैसे शोधकर्ताओं एवं कला इतिहासकारों के सहयोग की अपेक्षा भी व्यक्त की।

    राज्यपाल ने यह भी उल्लेख किया कि बंगाल के अनेक कलाकारों को त्रिपुरा के राजघराने का संरक्षण और प्रोत्साहन प्राप्त हुआ था, जिससे वहां की कला परंपरा को विकसित होने का अवसर मिला।

    इस अवसर पर वरिष्ठ चित्रकार वी. बी. पाठारे और प्रेमा पाठारे के सुपुत्र एवं वास्तुविशारद शिरीष पाठारे तथा पॉप्युलर प्रकाशन की अस्मिता मोहिते भी उपस्थित थीं।