बंद

    24.03.2022: राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांशी भेट

    प्रकाशित तारीख: March 24, 2022

    राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांशी भेट

    देशातील विविध राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

    यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच दिल्ली व चंदीगडचे राज्य निवडणूक आयुक्त एस के श्रीवास्तव, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान, हरयाणाचे राज्य निवडणूक आयुक्त धनपत सिंह व राज्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया उपस्थित होते.