बंद

  24.02.2024 : राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४० वा दीक्षांत समारंभ संपन्न

  प्रकाशित तारीख: February 24, 2024

  राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४० वा दीक्षांत समारंभ संपन्न

  राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसर, अमरावती येथे संपन्न झाला.

  दीक्षांत समारोहाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. दीपक कुमार श्रीवास्तव, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होत़े. दीक्षांत समारंभामध्ये ४१,११३ स्नातकांना पदव्या व २४४ विद्याथ्र्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या.

  या दीक्षांत समारंभात गुणवत्ताप्राप्त १६४ स्नातकांना सुवर्णपदके, रौप्यपदके व रोख पारितोषिके देण्यात आली तर २१५ संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.