बंद

    23.08.2021: करोना विषयक ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: August 23, 2021

    दृष्टिहीन लोकांमध्ये करोना विषयक जनजागृती आता हिंदी भाषेतुन

    करोना विषयक ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    दृष्टिहीन व्यक्तींमध्ये करोना विषयावर जनजागृती करणाऱ्या ब्रेल लिपितील ‘कोविड – १९ बिमारी और इलाज’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.23) राजभवन येथे करण्यात आले.

    पुस्तकाचे लेखक, सर्पमित्र व स्काऊट गाईड जिल्हा आयुक्त भरत जोशी यांनी यावेळी पुस्तकाबद्दल माहिती दिली. यावेळी दृष्टिहीन व्यक्तींनी ब्रेल लिपितील पुस्तकांचे उतारे वाचुन दाखविले.