बंद

    23.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाची बैठक संपन्न

    प्रकाशित तारीख: December 23, 2022

    राज्यपालांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाची बैठक संपन्न

    राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन नागपूर येथे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समस्यांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.

    बैठकीला राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार डॉ देवराव होळी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, वित्त विभागाच्या सचिव शायला ए., गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, उच्च शिक्षण प्रभारी संचालक शैलेंद्र देवळाणकर आदी उपस्थित होते.

    बैठकीत गोंडवाना विद्यापीठ विस्तारासाठी भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, अडपल्ली येथील विद्यापीठ परिसर विकासासाठी निधीची पूर्तता, विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करुन देणे, नवे रोजगारक्षम अभ्यासक्रम राबविणे तसेच विस्थापित लोकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर चर्चा झाली.