बंद

    22.12.2022 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय क्षयरोग अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

    प्रकाशित तारीख: December 22, 2022

    राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय क्षयरोग अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत विदर्भातील जिल्हा व शहर क्षयरोग अधिकाऱ्यांची आढावा बैठक राजभवन नागपूर येथे संपन्न झाली.

    बैठकीला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, नागपूर महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हा क्षयरोग अधिकारी उपस्थित होते.

    सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे भारतातून दुरीकरण करण्यासाठी अभियानात लोकसहभाग वाढविणे, नवे रुग्ण शोधणे व टीबी रुग्णांना रोगनिदान तसेच पौष्टिक आहार मिळवून देण्यासाठी निक्षय मित्र वाढविणे या दृष्टीने बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला.