बंद

    22.05.2023 : राजभवन येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख: May 22, 2023

    राजभवन येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
    राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

    भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची देखील आज पुण्यतिथी. हा दिवस ‘दहशतवाद विरोधी दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा’ देण्यात आली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

    राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल यांचेसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचे अधिकारी व जवान यावेळी उपस्थित होते.