बंद

    22.02.2024: ‘अश्वमेध महायज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून,याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे. – राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: February 22, 2024

    ‘अश्वमेध महायज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून,याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे.
    – राज्यपाल रमेश बैस

    नवीमुंबई, दि. 21 :- आपले पर्यावरण सर्व अशुद्धतेपासून मुक्त करण्यासाठी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’महत्वाचे आहे. पर्यावरण आणि सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणारी अनेक आव्हाने आणि वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी, तसेच समतोल, सदभाव आणि पवित्रता पुनर्संचयित करण्यासाठी हे यज्ञ एक शक्तिशाली साधन आहे. ‘अश्वमेध यज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून, याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे. असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

    अखिल जागतिक गायत्री परिवाराच्यावतीने आज खारघर पश्चिम नवीमुंबई येथील कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी आयोजित पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’ कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

    यावेळी वन, सांस्कृतिक आणि मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार, अखिल विश्व गायत्री परिवार अध्यक्ष श्रद्धेय शेलबाला पण्डया, गायत्री विदयापीठाचे अध्यक्ष, शेफाली पण्डया, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया, आदी मान्यवर तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
    राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, देव संस्कृती दिग्विजय अश्वमेध अभियान हा परम पूज्य गुरुदेवांच्या प्रेरणेने परम वंदनीय माताजींनी घेतलेला एक उत्तम संकल्प आहे. याआधी लोकांनी अश्वमेधासारख्या महायज्ञाचे नावच ऐकले किंवा वाचले होते. त्याचे दृश्य स्वरूप आणि अध्यात्मिक प्रक्रियेत पाहण्याचे, जाणून घेण्याचे आणि सहभागी होण्याचे भाग्य केवळ वंदनीय माताजींच्या निश्चयामुळेच शक्य झाले आहे. असेही राज्यपाल रमेश बैस यावेळी म्हणाले.
    ते पुढे म्हणाले की,विज्ञानाच्या प्रगतीमुळे कितीही फायदा झाला असला तरी पर्यावरणाची दुरावस्था झाली आहे. पर्यावरण प्रदूषित झाले आहे, उपभोगाच्या साधनांनी कामुकतेचा उन्माद आणला आहे. युद्धाच्या लालसेने आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात विनाशकारी शक्त्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या आहेत. अराजकता, भ्रष्टाचार आणि अनैतिकता पसरत आहे. राष्ट्र संघटित करण्यासाठी आणि संघटित होण्यासाठी कुठूनही आवाज उंचावल्यासारखे वाटत नाही. अशा स्थितीत देव संस्कृतीने आपले कार्य उत्तम प्रकारे केले आहे. आपल्या राष्ट्राची आणि संस्कृतीची अखंडता राखण्यासाठी देव संस्कृतीच्या माध्यमातुन विविध प्रयत्न केले जात आहेत. गायत्री परिवाराने देशाच्या उत्थानासाठी संकल्प केला आहे.
    राज्यपाल बैस म्हणले की, हा महायज्ञ म्हणजे काळाची हाक आहे. बदलाच्या क्षणांची ही सुरुवात आहे. परिवर्तनाच्या या युगात जन्माला आलेले आपण सर्व भाग्यवान आहोत. आदरणीय गुरुदेवांनी दशकांपूर्वी एक योजना दिली ज्याचे नाव आहे युग निर्माण. खरं तर हीच वेळ आहे जेव्हा एक नवीन युग तयार होईल.
    अश्वमेध महायज्ञ हे या काळातील एक विलक्षण कार्य आहे. प्रभू श्रीराम यांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले होते आणि असाच अश्वमेध यज्ञ आज आयोजित केला जात आहे. 500 वर्षांनंतर प्रभू राम मंदिराच्या अभिषेकाची वेळ आली आहे, ही एक ऐतिहासिक घटना आहे, ज्याचा प्रभाव वर्षानुवर्षे राहील आणि आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. हे अभिमानास्पद आहे.
    यावेळी बोलतांना राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विठ्ठलाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत हा अश्वमेध महायज्ञ होतो आहे. याचा मला अभिमान आहे. मुंबईतील पाच दिवसीय अश्वमेध महायज्ञचा शुभारंभ झाला आहे. या अश्वमेध महायज्ञामुळे फक्त वायु मंडलातील प्रदूषण मुक्त होणार नाही तर आपल्या अंतरमनातील प्रदूषणाचेही शुद्धीकरण होईल. हे वर्ष सर्व भारतीयांसाठी ऐतिहासीक आणि अविस्मरणीय आहे. करण या वर्षाच्या प्रारंभी आयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा महाराष्ट्रातील सागवनापासून तयार केला आहे. ही महाराष्ट्रसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्राला महा बनविण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात होणे आवश्यक आहे. त्यामुळेच गायत्री परिवाराने महायज्ञासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. असे मत श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले.
    प्रास्तवित भाषणात देव संस्कृती विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया यांनी अश्वमेध महायज्ञाचा इतिहास सांगितला. तसेच या पाच दिवसीय महायज्ञाची माहिती दिली.

    *****