बंद

    21.07.2020 लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: July 21, 2020

    लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
    राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. श्री. लालजी टंडन यांचे सोबत अनेक वर्षे कार्य करण्याचे सौभाग्य मला लाभले. ते उत्कृष्ट संघटक व संसदपटू होते. बिहार व मध्यप्रदेश राज्यांचे राज्यपाल या नात्याने त्यांनी आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे निष्ठेने पालन केले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.