बंद

    21.02.2024: अमीन सयानी यांना राज्यपालांची श्रद्धांजली

    प्रकाशित तारीख: February 21, 2024

    अमीन सयानी यांना राज्यपालांची श्रद्धांजली

    राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    आकाशवाणी व रेडिओ सिलोन वरील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अमीन सयानी यांनी हजारो सांगीतिक कार्यक्रम व जिंगल्स सादर करून जगभरातील रसिकांची मने जिंकली. ‘बहनो और भाईयो’ ही त्यांची उद्घोषणा देखील अतिशय लोकप्रिय ठरली.

    त्यांच्या अनोख्या शैलीमुळे रेडिओ सिलोन वरील गीतमाला व इतर कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या निधनामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील एक महान रेडिओ उद्घोषक व आवाजाचा जादूगार गमावला आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.