बंद

    21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित

    प्रकाशित तारीख: February 21, 2021

    राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित

    ‘महाराष्ट्र, केरळ येथील वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय’

    ‘लोकांनी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल’ राज्यपालांचा इशारा

    केरळ व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल. प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास करोनाचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २१) राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या.

    करोना काळात समाजातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसऱ्याला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले असे राज्यपालांनी नमूद केले. करोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्पवर्षाव केला ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाली असे राज्यपालांनी सांगितले.

    ईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो सर्व जनाजनात वास करीत आहे, हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला असे राज्यपालांनी सांगितले. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर करोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    समाजसेवी धनंजय गोसावी, रक्तदाते करण किणे, डॉ संदीप पाटेकर, डॉ हेमांगी घोडे, डॉ अस‍िफ पोची, डॉ रावुत मोईनुददीन, डॉ शर्मीन शब्बीर डिग्रा, डॉ सुदर्शन सोनोणे, डॉ मुमताझ शाह, डॉ कनक राजु गंगाराम, अग्निशामन विभागातील तंबेश्वर मिश्रा, अग्निशामन विभागातील हितेश प्रकाश राऊत, अविनाश किणे (मरणोत्तर), पत्रकार खलील शरीफ गिरकर, पत्रकार युसुफ पुरी, ठाणे पोलीस हवालदार जुलालसिंग विठठल परदेशी, ठाणे पोलीस शांताराम प्रभाकर सावंत, मुकादम सफाई कर्मचारी महेश धनाजी भागराव, समाजसेवी अब्दुला सुभान शेख, समाजसेवी मोहम्मद अरिफ मोहमद इकबाल शेख, जुझर इस्माईल पेटीवाला, अन्वर अल‍ि मोहमद नुरी, निर्मल सोलंकी, मोहम्मद ओन मोमीन, परवेझ एम ए फरीद, चांद कुरेशी, तृप्ती किणे, अरिफ खान पठान, राजेश देवरुखकर, आकाश पाटील, किशोर बाटेकेर, आरती राहटे, बापु मखरे, ठाणे महानगर पालिकेतील कर विभागातील गिरीश रतन अहिरे, ठाणे महानगर पालिकेतील गिरीश मोरे, नैनेश भालेराव, अनिता किणे, राजन किणे, मोरेश किणे यांना यावेळी राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.