बंद

    20.10.2020 : पृथ्वीराज कोठारी भारत जैन रत्न पुरस्काराने सन्मानित

    प्रकाशित तारीख: October 20, 2020

    20.10.2020 : जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे संस्थापक सदस्य व संचालक पृथ्वीराज कोठारी यांना मंगळवारी (दि. २०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भारत जैन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    करोना संसर्गाच्या काळात अनेक गरजू लोकांना विविध प्रकारे मदत केल्याबददल कोठारी यांचा राजभवन येथे सन्मान करण्यात आला.

    यावेळी मिरा भाईंदरच्या आमदार गिता जैन, राजगुरु फाऊंडेशनचे संपतराज जैन, कोक‍िलाबेन झवेरी, प्रकाश झवेरी, चंपालाल, कल्याणमस्तु परिवाराचे निलेश शहा, योगेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.