बंद

    20.08.2021:इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

    प्रकाशित तारीख: August 20, 2021

    इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

    या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचे देखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली.