बंद

    20.06.2023 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिम‍ित्त राज्यपालांचे कार्यक्रम

    प्रकाशित तारीख: June 20, 2023

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिम‍ित्त राज्यपालांचे कार्यक्रम

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे उदया (२१ जून) सकाळी ७ वाजता ‘योग प्रभात’ हा योग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून ‘योग प्रभात’ कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह विधानमंडळाचे सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत.

    २. आंतरराष्ट्रीय योग दिनानिम‍ित्त राजभवन येथे सकाळी ८.15 वाजता श्रीमद राजचंद्र मिशन धरमपुर या संस्थेच्या वतीने योग शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.