बंद

    20.05.2023 : मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे; प्रा. हरे राम त्रिपाठी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

    प्रकाशित तारीख: May 20, 2023

    मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे; प्रा. हरे राम त्रिपाठी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव अर्जुनराव सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरे राम त्रिपाठी यांची कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी प्रा. संजीव सोनवणे व प्रा. हरे राम त्रिपाठी यांची नियुक्ती जाहीर केली आहे.