बंद

  20.03.2020 – न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

  प्रकाशित तारीख: March 20, 2020

  न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.

  राजभवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपालांनी न्या. धर्माधिकारी यांना पदाची शपथ दिली.

  शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.