बंद

    19.09.2021 सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

    प्रकाशित तारीख: September 19, 2021

    सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

    सोनाली नवांगुळ यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी तर डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून आनंद वाटला.

    सोनाली नवांगुळ व डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करीत पुरस्कार प्राप्त केल्याचे समजून विशेष अभिमान वाटला. उभय लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करतो व भविष्यातही त्यांचेकडून साहित्यसेवा घडो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे.