बंद

  19.03.2024: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

  प्रकाशित तारीख: March 19, 2024

  राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

  राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितीत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारोह आज संपन्न झाला.

  दीक्षांत समारोहात ११००२ कृषि स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी ५७ उमेदवारांना पीएचडी प्रदान करण्यात आली.

  कार्यक्रमाला परभणी येथून कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ संजय कुमार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्र मणि, माजी कुलगुरु डॉ सी डी मायी, पंकृविचे कुलगुरु डॉ शरद गडाख, माफसूचे कुलगुरु डॉ नितीन पाटील, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अध्यापक, माजी विद्यार्थी व स्नातक उपस्थित होते.