बंद

    19.02.2025: शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 19, 2025
    19.02.2025: छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यपालांचे राजभवन येथे अभिवादन

    शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले.