बंद

    19.02.2024 : शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 19, 2024

    शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव आदी उपस्थित होते.