बंद

    19.02.2021 : राज्यपालांची आधारिका समाज विकास संस्थेला भेट; महिलांशी साधला संवाद

    प्रकाशित तारीख: February 19, 2021

    राज्यपालांची आधारिका समाज विकास संस्थेला भेट; महिलांशी साधला संवाद

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महावीर नगर कांदिवली येथील आधारिका समाज विकास संस्थेला भेट देऊन तेथील महिलांच्या कौशल्य प्रशिक्षण व उद्यमशीलता केंद्राची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

    मातृशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे; अपार कष्ट सहन करून मातृशक्ती संसाराचा गाडा चालवते. विश्वाप्रती मातृत्वभाव जागविल्यामुळेच संत ज्ञानेश्वरांना ‘माऊली‘ म्हणून संबोधले जाते. आज महिला विकासासाठी मुद्रा, स्टार्टअप, पंतप्रधान कौशल्य विकास आदि विविध योजना उपलब्ध आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती करावी. मात्र केवळ उपजीविकेसाठी काम न करता इतर महिलांना देखील पुढे आणावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    यावेळी वाहन चालक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर अभ्यासक्रम, शिलाईकाम इत्यादि प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त केलेल्या महिलांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आधारिका समाज विकास संस्थेच्या संचालिका रुची माने, नगर सेविका बिना दोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ रन्ना दोशी उपस्थित होते.