बंद

    19.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

    प्रकाशित तारीख: January 19, 2025
    19.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

    राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

    गीतकार गुलजार यांचा स्पर्धेत सहभाग

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून टाटा मुंबई मॅरेथॉन ‘एलिट’ स्पर्धेला स्पोर्ट्स गनने बार करुन रवाना केले. यावेळी ‘चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीज’ – दिव्यांग व्यक्तींची स्पर्धा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेला देखील राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ झाला.

    गीतकार गुलजार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत सहभाग घेतला.

    राज्याचे अल्पसंख्याक व वक्फ मंत्री दत्ता भरणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कार्यक्रमाचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंग आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते.

    यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ६० हजार स्पर्धक सहभागी होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.