बंद

    18.11.2023 : आंतर शालेय भारतीय नौदल प्रश्नमंजुषा ‘जी – 20 थिंक नॅशनल’ स्पर्धेची अंतिम फेरी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

    प्रकाशित तारीख: November 19, 2023

    आंतर शालेय भारतीय नौदल प्रश्नमंजुषा ‘जी – 20 थिंक नॅशनल’ स्पर्धेची अंतिम फेरी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

    भारतीय नौदल आणि ‘नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशन’च्या वतीने आयोजित आंतर शालेय भारतीय नौदल प्रश्नमंजुषा ‘जी – 20 थिंक नॅशनल’ स्पर्धेची अंतिम फेरी राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘गेटवे ऑफ इंडिया’ मुंबई येथे संपन्न झाली.

    अंतिम फेरीत उत्तीर्ण झालेले स्पर्धक इंडिया गेट नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘G – 20’ देशांच्या आंतर राष्ट्रीय प्रश्नमंजुषा फेरीत सहभागी होतील.

    गुरुग्राम येथील दयानंद एंग्लो वैदिक शाळेतील (DAV Public School) विद्यार्थांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी अंतिम फेरीत उत्तीर्ण झालेल्या स्पर्धकांचा राज्यपालांनी सत्कार केला.

    यावेळी नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, ‘नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशन’च्या अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाईस एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी तसेच नौसेनेचे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी उपस्थित होते.