बंद

  18.11.2020 : मृदुला सिन्हा यांच्या निधनाबदृल राज्यपालांना दु:ख

  प्रकाशित तारीख: November 18, 2020

  मृदुला सिन्हा यांच्या निधनाबदृल राज्यपालांना दु:ख

  महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाबददल दु:ख व्यक्त केले आहे.

  श्रीमती मृदुला सिन्हा एक कव‍ि मनाच्या लेखिका व समाजसेविका होत्या. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना चालना दिली. आपुलकीच्या वागण्यामुळे मृदुला सिन्हा यांनी जनमानसात आपला वेगळा ठसा निर्माण केला. मृदुला सिन्हा यांच्या स्मृतीला मी भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

  *****