बंद

    18.03.2022: धुलीवंदन, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: March 18, 2022

    धुलीवंदन, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी, धुलीवंदन व रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    वसंत ऋतुच्या आगमनाची ग्वाही देणारा होळी, धुलीवंदन व रंगोत्सवाचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. परस्पर बंधुभाव व मैत्रीचे बंध दृढ करणारा हा सण आहे. काही देशात करोनाचे ढग पुन्हा जमू लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगून हा सण साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन करतो व होळी व रंगोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.