बंद

    17.04.2024 : रामनवमी: राज्यपालांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

    प्रकाशित तारीख: April 17, 2024
    17.04.2024 : रामनवमी: राज्यपालांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

    रामनवमी: राज्यपालांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

    रामनवमी निमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभुरामाचे दर्शन घेतले व सर्व उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. यावेळी राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.