बंद

    16.09.2023 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: September 16, 2023

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

    मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय दिवस आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधील लोकांचे या लढ्यामध्ये भरीव योगदान होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहतो तसेच जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.