बंद

    16.05.2021 : ‘राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्ताने व्यथित’ : राज्यपाल कोश्यारी

    प्रकाशित तारीख: May 16, 2021

    ‘राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्ताने व्यथित’ : राज्यपाल कोश्यारी

    खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे

    तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. श्री सातव करोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. श्री सातव यांचेकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.