बंद

    16.01.2021: शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: January 16, 2021

    शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यपालांची भेट

    नागपूर दिनांक 16 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिक्षाभुमीजवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आज भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती घेतली.
    दसाल्ट एव्हिऐशन (फ्रान्स) व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एरोनॉटीकल स्ट्रक्चर व इक्युपमेंट फिटर या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेला देखील भेट दिली. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पुर्वी संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संस्थेच्या विस्तृत कार्याची माहिती दिली. कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दिपेन्द्रसिंह कुशवाहा यावेळी उपस्थित होते. केंद्र शासन या फ्रान्सच्या दसाल्ट कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाद्वारे वैमानिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ घडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ऑगस्ट 2019 पासून या अभ्यासक्रमाला सुरवात झाली असून त्यास चांगला प्रतिसाद आहे. यासाठी फ्रान्सचे चार शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.