बंद

    15.08.2024 : राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे राजभवन येथे ध्वजारोहण

    प्रकाशित तारीख: August 15, 2024
    15.08.2024 :  राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे राजभवन येथे ध्वजारोहण

    राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे राजभवन येथे ध्वजारोहण

    भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज पुणे येथील राजभवन परिसरात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

    यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत गायले.

    यावेळी राज्यपालांनी उपस्थित राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच लहान मुलांना मिठाईचे वाटप केले.