बंद

  15.06.2022: राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

  प्रकाशित तारीख: June 14, 2022

  राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामदेव भोसले लिखित ‘मराशी’ या पुस्तकाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले.

  यावेळी सकाळ डिजिटल चे संपादक सम्राट फडणीस, नामदेव भोसले यांच्या आई शेवराबाई भोसले, बाळासाहेब चवरे आदी उपस्थित होते.

  मराशी हे पुस्तक आदिवासी पारधी बोलीभाषा व रूढी परंपरा या विषयावर आधारित असून लेखकाने त्यातून आपल्या यातना व अनुभव मांडले आहेत.