बंद

    14.10.2021: विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: October 15, 2021

    विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    सतप्रवृत्तीचा नेहमी विजय होतो याचे स्मरण देणारा हा सण आहे. करोना संकटामुळे आलेले मळभ दूर करून दसऱ्याचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेवून येवो या आशेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.