बंद

    13.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    प्रकाशित तारीख: October 13, 2022

    राजभवन येथे २०२० व २०२१ वर्षांकरिता पोलीस अलंकरण समारोह संपन्न

    राज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १३) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दिवंगत प्रकाश नरेश येरम व सहायक पोलीस उपनिरीक्षक दिवंगत राजू इरप्पा उसेंडी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले.

    सत्तावीस (२७) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ९ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

    पोलीस अलंकरण समारोहाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

    पोलीस शौर्य पदक २०२०

    पोलीस निरीक्षक राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस हवालदार मनीष पुंडलीक गोरले, पोलीस नाईक गोवर्धन जनार्दन वाढई, पोलीस नाईक कैलास काश‍ि राम उसेंडी, पोलीस नाईक कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस श‍िपाई शिवलाल रुपसिंग हिडको, सहायक पोलीस उप निरीक्षक राकेश रामसू हिचामी, पोलीस श‍िपाई वसंत नानका तडवी, पोलीस श‍िपाई सुभाष पांडूरंग उसेंडी, पोलीस श‍िपाई रमेश वेकन्ना कोमीरे, सहायक पोलीस उप निरीक्षक सुरेश दुर्गूजी कोवासे, सहायक पोलीस उप निरीक्षक रतिराम रघुराम पोरेटी, पोलीस हवालदार प्रदीपकुमार रायभान गेडाम, पोलीस हवालदार राकेश महादेव नरोटे,

    पोलीस शौर्य पदक २०२१

    आर. राजा, पोलीस उप आयुक्त‍, नागनाथ गुरुसिध्द पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महादेव मारोती मडावी, पोलीस हवालदार, कमलेश अशोक अर्का, पोलीस नाईक, अमुल श्रीराम जगताप, पोलीस नाईक, वेल्ल कोरके आत्राम पोलीस नाईक, हेमंत कोरके मडावी, पोलीस शिपाई, सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस शिपाई, बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस श‍िपाई, हरि बालाजी एन, पोलीस उप आयुक्त, निलेश मारोती ढुमणे, पोलीस हवालदार, गिरीश मारोती ढेकले, पोलीस शिपाई, गजानन दत्तात्रय पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना पोलीस शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.

    उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रीय पोलीस पदक २०२०

    अपर पोलीस महासंचालक र‍ितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल, सहायक पोलीस आयुक्त सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगन्नाथ म्हेत्रस तसेच २०२१ साठी अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह, (सेवानिवृत्त) सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती तुकाराम कदम, (सेवानिवृत्त) सहायक पोलीस आयुक्त विलास बाळकू गंगावणे यांना उल्लेखनिय सेवेबददल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

    पोलीस अधीक्षक धनंजय रामचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस आयुक्त विनायक बद्रीनारायण देशमुख, पोलीस अधीक्षक शिरीष लिलाधर सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक तुषार चंद्रकांत दोशी, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र १९ , अहमदनगर सादेख अली नुसरतअली सय्यद, पोलीस उप अधीक्षक (सेवानिवृत्त) नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, सहायक समादेशक (सेवानिवृत्त) मोहमद इलियास मोहमद सईद शेख, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) सुनिल भगवानराव यादव, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) प्रतिभा संजिव जोशी, पोलीस उप अधीक्षक अनिल प्रल्हाद पात्रुडकर, सहायक पोलीस आयुक्त सुर्यकांत गणपत बांगर, पोलीस उप अधीक्षक हरिष दत्तात्रय खेडकर, सहायक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपुत, सहायक पोलीस आयुक्त अरविंद धोंडीबा आल्हाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) दगुभाई महंमद शेख,

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम शंकर कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी कृष्णा पवार, पोलीस निरीक्षक शालीनी संजय शर्मा वरिष्ठ, पोलीस निरीक्षक सुनिल किसनराव धनावडे, पोलीस निरीक्षक विनय बाबुराव घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) विलास विठ्ठल पेंडूरकर, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) मच्छिद्र सारंगधर रणमाळे, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) विरेंद्रकुमार श्रीकृष्ण चौबे, सहायक पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) संजय सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक (दिवंगत) प्रकाश नरेश येरम, वरिष्ठ गुप्तवार्ता अध‍िकारी भााऊसाहेब रामनाथ एरंडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) रमेश रामाजी बरडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) संद‍िप मनोहरलाल शर्मा, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) शाम गणपत वेटाळ, पोलीस उपनिरीक्षक विश्वास दिनकरराव भोसले, पोलीस उपनिरीक्षक विजय वासुदेव खर्चे, पोलीस उपनिरीक्षक रऊफ समद शेख, पोलीस उपनिरीक्षक मोईनोदीन फक्रुदीन तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बाबुराव कावळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप राधक‍िसन चौरे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल शामकांत पाटील, गुप्तवार्ता अध‍िकारी (सेवानिवृत्त) तात्याराव बाजीराव लोंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास मोहनराव सनांसे , विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र अनंत शिसवे, पोलीस अधीक्षक प्रविणकुमार चडामण पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्पना यशवंत गाडेकर, सहायक पोलीस आयुक्त संगिता लायनल शिंदे- अल्फोन्सो, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) दिनकर नामदेव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद मनोहर देसाई, पोलीस उपअधीक्षक विजय चिंतामण डोळस,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर,पोलीस निरीक्षक, मेघशाम दादा डांगे,पोलीस निरीक्षक, तानाजी दिगंबर सावंत,पोलीस निरीक्षक, मनिष मधुकर ठाकरे,पोलीस निरीक्षक, राजू भागुजी बिडकर, पोलीस निरीक्षक, अजय रामदास जोशी,पोलीस निरीक्षक, प्रमोद भाऊ सावंत, पोलीस निरीक्षक, भगवान मरिबा धबडगे, पोलीस उपनिरीक्षक, (सेवानिवृत्त) रमेश मुगटराव कदम, राखीव पोलीस उपनिरीक्षक राजेश बाबुलाल नगरुकर, पोलीस उपनिरीक्षक, (सेवानिवृत्त) सुर्यकांत कृष्णा बोलाडे,पोलीस उपनिरीक्षक अशोक कमलाकर मांगलेकर, पोलीस उपनिरीक्षक जीवन हिंदूराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रमाकांत मांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय नामदेवराव बोरीकर, पोलीस उपनिरीक्षक उदयकुमार रघुनाथ पालांडे, पोलीस उपनिरीक्षक थॉमस कार्लोंस डिसोझा, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाबुराव चौगुले, पोलीस उपनिरीक्षक , (सेवानिवृत्त) भरत ज्ञानदेव नाळे, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) हेमंत नागेश राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) रामदास बाजीराव गाडेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) हेमंत काश‍िनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक शाकीर गौसमोहददीन जिनेडी, पोलीस उपनिरीक्षक संजय रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक जयराम बाजीराव धनवई, सहायक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शेषरावजी बारड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिवराम मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पुंड‍लीक साटम, सहायक पोलीस उपनिरीक्षक शारदाप्रसाद रमाकांत मिश्रा सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ज्ञाानेश्वर अंडील, सहायक पोलीस उपनिरीक्षक (दिवंगत) राजू इरपा उसेंडी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.