बंद

    13.05.2021: ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: May 13, 2021

    ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्व दिले आहे. करोनाचे संकट अदयाप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखिल रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना करतो व सर्वांना, विशेषतः मुस्लिम भगिनी – बंधूंना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.