13.04.2024 : लोकांमधील बंधुभाव कायम रहावा, देश व राज्य संपन्न व्हावे, रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
लोकांमधील बंधुभाव कायम रहावा, देश व राज्य संपन्न व्हावे, रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
रमजान ईद निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त राजभवन परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी (दि. १३) राज्यपालांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
विविधतेमध्ये एकता ही भारताची संस्कृती आहे. विविध रंगांची फुले एकत्र आल्यामुळे सुंदर पुष्पगुच्छ तयार होतो. त्याप्रमाणे विभिन्न धर्म व पंथाचे लोक एकत्र राहत आल्यामुळे भारताला सुंदरता लाभली आहे. ही सुंदरता कायम राहावी, लोकांमधील बंधुभाव कायम राहावा व आपला देश, आपले राज्य व लोक संपन्न व्हावे, या शब्दात राज्यपालांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अजीज शेख, इफ्तिखार अली, अल्ताफ सैयद, सलीम शेख, जावेद पारेख आदी उपस्थित होते.