बंद

    13.04.2023 : राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

    प्रकाशित तारीख: April 13, 2023

    राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

    नागपूर, दि १३. : राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

    राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.

    जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर