बंद

    12.05.2026: राज्यपालांची जहांगीर आर्ट गॅलरी येथे “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाला भेट

    प्रकाशित तारीख : May 13, 2026
    12.05.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी आज मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार  श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रसंगी श्रीमती  तपती भौमिक मजूमदार यांनी राज्यपालांचे स्वागत केले. १२ ते १८ मे २०२६ दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनात निसर्ग, पारंपरिक वस्त्रकला आणि सांस्कृतिक अलंकारांवर आधारित आधुनिक कलाकृतींचा समावेश आहे.  राज्यपालांनी कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे आणि गहनतेचे कौतुक करत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व कलात्मक वारशात कलाकारांच्या योगदानाचे अभिनंदन केले.  या कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक श्री. मारुती शेळके, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार तसेच इतर कला प्रेमी यावेळी उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाचे मंगळवारी जहांगीर कलादालन मुंबई येथे उदघाटन केले.
    राज्यपालांनी कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना तपती भौमिक मजूमदार यांचे अभिनंदन केले.
    कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार तसेच कला प्रेमी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत खुले आहे.

    राज्यपाल ने तापती भौमिक मजुमदार की चित्रकला प्रदर्शनी का उद्घाटन किया

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मंगलवार (12 मई) को मुंबई स्थित जहांगीर आर्ट गॅलरी में त्रिपुरा की प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकार तापती भौमिक मजुमदार की चित्रकला प्रदर्शनी ‘भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ’ का उद्घाटन किया।राज्यपाल ने प्रदर्शनी का अवलोकन किया तथा तापती भौमिक मजुमदार द्वारा निर्मित कलाकृतियों और उनकी विशिष्ट कला शैली की सराहना की।इस अवसर पर वरिष्ठ कलाकार तथा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट के प्राध्यापक मारुती शेलके, वरिष्ठ अभिनेत्री जयति भाटिया, साध्वी मजुमदार तथा कला प्रेमी उपस्थित थे।यह प्रदर्शनी 18 मई तक खुली रहेगी।