बंद

    12.05.2026: भटके विमुक्त विकास परिषद सदस्यांची राज्यपालांसोबत चर्चा

    प्रकाशित तारीख : May 13, 2026
    12.05.2026: भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांचेसह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.  राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील प्रतिनिधींना आपण लोकभवन येथे निमंत्रित करुन त्यांच्या समस्या जाणून घेऊ असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्टमंडळाने भटक्या विमुक्त समाजाच्या शिक्षण, आरोग्य, सरकारी नोंदीसंबंधी कागदपत्रे आदी प्रश्नांवर चर्चा केली. परिषदेने राज्यपालांना यमगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील एकलव्य विद्या संकुल येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच दिनांक ३१ ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त जातीचा दाखल, आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर व राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

    भटके विमुक्त विकास परिषद सदस्यांची राज्यपालांसोबत चर्चा

    भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांचेसह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.

    राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील प्रतिनिधींना आपण लोकभवन येथे निमंत्रित करुन त्यांच्या समस्या जाणून घेऊ असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले.

    यावेळी शिष्टमंडळाने भटक्या विमुक्त समाजाच्या शिक्षण, आरोग्य, सरकारी नोंदीसंबंधी कागदपत्रे आदी प्रश्नांवर चर्चा केली. परिषदेने राज्यपालांना यमगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील एकलव्य विद्या संकुल येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच दिनांक ३१ ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त जातीचा दाखल, आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

    यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर व राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

    **
    भटके विमुक्त विकास परिषद की राज्यपाल से घुमंतू एवं विमुक्त जनजाति के लोगों समस्याओं पर चर्चा

    भटके विमुक्त विकास परिषद के अध्यक्ष उद्धव काळे तथा परिषद के पदाधिकारियों ने महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा से लोकभवन, मुंबई में भेंट कर राज्य के अतिमागास घुमंतू एवं विमुक्त जनजाति के लोगों की विभिन्न समस्याओं पर चर्चा की।

    इस अवसर पर शिष्टमंडल ने घुमंतू एवं विमुक्त जनजाति के शिक्षा, स्वास्थ्य तथा शासकीय अभिलेखों से संबंधित दस्तावेजों आदि विषयों पर चर्चा की। परिषद ने राज्यपाल को धाराशिव जिले के तुळजापुर तालुका स्थित यमगरवाडी के एकलव्य विद्या संकुल का दौरा करने का निमंत्रण दिया। साथ ही 31 अगस्त को विमुक्त दिवस के अवसर पर जाति प्रमाणपत्र, आधार कार्ड तथा अन्य दस्तावेज वितरण कार्यक्रम में शामिल होने का निमंत्रण भी दिया।

    राज्यपाल ने शिष्टमंडल से कहा कि राज्य के अतिमागास घुमंतू एवं विमुक्त जनजाति समाज के प्रतिनिधियों को लोकभवन में आमंत्रित कर उनकी समस्याओं को समझा जाएगा।

    इस अवसर पर भटके विमुक्त विकास परिषद के कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर तथा राहुल चव्हाण आदि उपस्थित थे।