बंद

    12.05.2022 : उत्तर पूर्व राज्यातील रेड कार्पेट सामाजिक पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

    प्रकाशित तारीख: May 12, 2022

    उत्तर पूर्व राज्यातील रेड कार्पेट सामाजिक पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

    चौथे नॉर्थ ईस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. १२) स्वागत समारंभाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी ८ उत्तर पूर्व राज्यांमधून आलेल्या विविध प्रतिनिधींशी संवाद साधला.

    यावेळी पुरस्कार समितीच्या संस्थापिका रिबेका चांगकीजा सेमा, ज्युतिका महंता, अभिनेत्री जसविंदर गार्डनर तसेच उत्तर पूर्व राज्यांचे शुभचिंतक उपस्थित होते.