बंद

    12.03.2024: राजभवन येथे यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त अभिवादन

    प्रकाशित तारीख: March 12, 2024

    राजभवन येथे यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त अभिवादन

    देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांच्या सह सचिव (प्रशासन) श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ , यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.