बंद

  11.05.2021 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट

  प्रकाशित तारीख: May 11, 2021

  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट

  मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले.

  यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलिप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.