बंद

  10.07.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई वेस्टर्न एलिट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

  प्रकाशित तारीख: July 10, 2021

  राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई वेस्टर्न एलिट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई वेस्टर्न एलिट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ शनिवारी (दि. १० जुलै) संपन्न झाला. यावेळी क्लबचे नवे अध्यक्ष जितेंद्र गोयल व बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांचे पदग्रहण झाले.

  कार्यक्रमाला क्लबचे संपर्क प्रमुख विकाश अगरवाल, मावळत्या अध्यक्ष शेलजा चौधरी आदी उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना रोटरी क्लबच्या सदस्यांनी करोना काळात गरजू लोकांना मदत करण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली.

  रोटरी क्लबचे सदस्य यशस्वी उद्योजक, व्यावसायिक व सनदी लेखापाल असून ते खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहेत असे सांगून समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आत्मसंतुष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

  करोनाचे आव्हान अद्याप संपलेले नसल्यामुळे लोकांनी करोनाविरुद्ध आपला सावध पवित्र सोडू नये, असे सांगताना रोटरी क्लबच्या सदस्यांनी समाजात करोना बाबत सातत्याने जनजागृती करावी असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.