बंद

  10.02.2022: राष्ट्रपतींचे आगमन, राज्यपालांकडून स्वागत

  प्रकाशित तारीख: February 10, 2022

  राष्ट्रपतींचे आगमन, राज्यपालांकडून स्वागत

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज ४ दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले.

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले.

  यावेळी राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती व इतर अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवारी राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे.