बंद

  09.11.2021: राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकचा दीपावली विशेषांक प्रकाशित

  प्रकाशित तारीख: November 9, 2021

  राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकचा दीपावली विशेषांक प्रकाशित

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. ९) राजभवन येथे संपन्न झाले.

  कार्यक्रमाला हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, बडवे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संस्थापक श्रीकांत बडवे, उद्योजक अनुप सुर्वे, श्रीनिवास लक्ष्मण तसेच अंकामध्ये सहभागी लेखक उपस्थित होते.

  साप्ताहिक विवेक राष्ट्रभक्तीपर विचारांच्या प्रचार – प्रसारासोबत विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विचारांवर समाजाचे प्रबोधन करीत असल्याबद्दल राज्यपालांनी ‘विवेक’ परिवाराचे अभिनंदन केले.

  भारत सुखी, समृद्ध व सशक्त राष्ट्र होऊन गतिमान भारत व आत्मनिर्भर भारत या संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ‘विवेक’ विचारांनी राष्ट्र निर्माण कार्याला गती मिळेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.