बंद

  09.11.2020 : राज्यपालांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

  प्रकाशित तारीख: November 9, 2020

  *राज्यपालांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी*

  *अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता*

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली व रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.

  राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.

  *****